नवी मुंबई :निर्यात शुल्कविरोधात नाशिकमधील व्यापाऱ्यांनी पुकारलेला होता. या बंदला वाशीतील एपीएमसीमधील व्यापाऱ्यांनी पाठिंबा देण्यासाठी आज गुरुवारी एक दिवसीय बंद पुकारला होता. मात्र नाशिक येथील बाजार समिती सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबई एपीएमसीने देखील शेतकऱ्यांची कोणतीही असुविधा होऊ नये म्हणून गुरुवारी ठेवण्यात आलेला बंद मागे घेण्यात आला आहे, अशी माहिती कांदा-बटाटा अडत व्यापारी संघाचे अध्यक्ष राजीव मिणियार यांनी दिली आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या कांदा निर्यातशुल्क वाढवल्याच्या निषेधार्थ राज्यातील शेतकरी संघटनेचे व्यापारी संघटना यांच्याकडून विरोध दर्शविला जात आहे. त्यामुळे नाशिक येथील कांदा लिलाव बंद करण्यात आले होते. त्या बंदला पाठींबा देण्यासाठी मुंबई एपीएमसीने २४ रोजी बंद पुकारला होता. मात्र नाशिक येथील बाजार समिती गुरुवारपासून सुरू होणार आहे. या बंदच्या दरम्यान एपीएमसीमध्ये शेतकऱ्यांनी एपीएमसीमध्ये कांदा पाठविला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये गुरुवारी बंदचा निर्णय मागे घेण्यात आलेला आहे.
निर्यात शुल्क विरोधात नाशिक मधील व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता मात्र गुरुवापासून नाशिक मधील.बाजार समिती सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे नाशिक बाजार समिती सुरू होणार असल्याने मुंबई एपीएमसीत मध्ये शेतकऱ्यांची असुविधा होऊ नये म्हणून गुरुवारचा बंद निर्णय मागे घेण्यात आला असून गुरुवारी कांदा-बटाटा बाजार नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे, अशी माहिती कांदा-बटाटा अडत व्यापारी संघाचे अध्यक्ष राजीव मणियार यांनी दिली.