वास्तुवैभवचे स्तंभलेखक रमेश नाईक कालवश

ठाणे: वास्तुवैभव या वाचकप्रिय स्तंभाचे लेखक रमेश नाईक यांचे आज निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते.
‘ठाणेवैभव’ परिवाराचे सदस्य असणाऱ्या नाईक यांनी महाविद्यालयात असल्यापासून पत्रकारितेची सुरुवात केली. एका खाजगी कंपनीत काम करता करता त्यांनी वास्तुशास्त्राचा अभ्यास सुरु केला आणि त्यात ते पारंगत झाले. ‘ठाणेवैभव’मधून सर्वाधिक काळ स्तंभ लिहिणारे ते लोकप्रिय लेखक होते. त्यांचा एक चाहता वर्ग होता. गेली काही वर्षे ते वास्तुशास्त्राचे सल्लागार म्हणून कार्यरत होते.