अनिकेत हिरडे आणि श्रुती श्रोते देखील यादीत
नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालात पहिल्या तीन स्थानावर मुलींनी स्थान पटकावत बाजी मारली आहे. इशिता किशोर ही देशांतून पहिली आली आहे. तर गरिमा लोहिया आणि उमा हरिथी या देशातून अनुक्रमे दुसरी तिसरी आली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून ठाण्याची कश्मिरा संख्ये प्रथम आली आहे. तर ठाण्यातील अनिकेत हिरडे आणि श्रुती श्रोते यांनी देखील यादीत स्थान पटकावले आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये यंदा मुलींचा दबदबा पाहायला मिळाला आहे. पहिल्या तीन क्रमांकावर मुलींनी स्थान पटकावले आहे. तर महाराष्ट्रात देखील पहिल्या स्थानावर मुलींनी बाजी मारली आहे. ठाण्याची कश्मीरा संखे ही महाराष्ट्रातून पहिली आली आहे. तर कश्मीरा ही देशातून 25 वी आली आहे. कश्मीराचा हा तिसरा प्रयत्न होता. तिने याआधी दोन वेळा प्रयत्न केला होता, परंतु यंदा तिच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. कश्मीराचे बाबा एका खासगी कंपनीत कामाला आहेत तर तिची आई देखील नोकरी करते.
ठाण्यातील ब्रम्हांड येथे राहणारी श्रुती श्रोते हिने देखील यादीत स्थान पटकावले आहे. लंडन येथील किंग्ज कॉलेजमधून तिने पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे. तिचे वडिल मुंबई महापालिकेच्या सेवेत मोठ्या हुद्द्यावर असून आई गृहिणी आहे.
अंतिम निकालात एकून 933 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 345 विद्यार्थी यामध्ये सामान्य (खुला) गटातून-345, आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस)-99, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी)-263, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी)-154, अनुसूचित जमाती प्रवर्गातून-72 उमेदवारांचा समावेश आहे. लोकसेवा आयोगाने 178 उमेदवारांची आरक्षित सूची तयार केली आहे. तसेच आयएएस पदावर निवड करण्यासाठी 180 विद्यार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. तसेच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका 15 दिवसांनी मिळणार असल्याची माहिती आता मिळत आहे. एप्रिलपर्यंत 118 विद्यार्थ्यांची मुलाखत घेण्यात आली होती. या मुलाखतीच्या फेरीला 30 जानेवारीपासून सुरुवात झाली होती. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून ही परीक्षा तीन टप्प्यात घेण्यात येते.
यंदा अव्वल आलेले विद्यार्थी
१) इशिता किशोर, २) गरिमा लोहिया, ३) उमा हरति एन, ४) स्मृति मिश्रा, ५) मयूर हजारिका, ६) गहना नव्या जेम्स, ७) वसीम अहमद भट, ८) अनिरुद्ध यादव, ९) कनिका गोयल, १०) राहुल श्रीवास्तव