पाच लाखांच्या मुद्देमालासह टोळी जेरबंद

ठाणे: सराईत चोरांची टोळी बनेली टिटवाळा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे गुन्हे शाखा घटक तीन कल्याणचे पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर आणि अंमलदार यांनी सापळा लावून चार जणांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे चौकशी केली असता शहर आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जबरीने केलेल्या सोनसाखळी चोरी आणि नागरिकांची बतावणी करून फसवणूक केलेले असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले. सर्व गुन्ह्यांत मिळून एकूण सात तोळे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, मोबाईल, गुन्ह्यांत वापरलेले चाकू व रोख रक्कम असे एकूण पाच लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

आरोपींपैकी तीन आरोपी डोंबिवली व कल्याण येथे राहणारे असून, एक आरोपी जयसिंगपूर कोल्हापूर राहतो. या चार आरोपींकडून सहा गुन्हे उघडकीस आणले आहेत.