ठाणे : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस आणि सीएसएमटी-कल्याण लेडीज स्पेशल उपनगरीय लोकलचे सारथ्य सर्व महिला कर्मचा-यांनी केले.
म. रेल्वेची प्रतिष्ठित ट्रेन मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेसच्या मुख्य चालक (एल.पी.) सुरेखा यादव, सहाय्यक लोको पायलट (एएलपी) सायली सावर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली आशियातील पहिल्या महिला लोको-पायलट सोबत चालवण्यात आली. लीना फ्रान्सिस यांनी ट्रेन मॅनेजरची (गार्ड) जबाबदारी पार पाडली.
रेल्वे प्रवाशांना सहा महिला प्रमुख प्रवासी तिकीट परीक्षकांच्या पथकाने मार्गदर्शन व मदत केली. सर्व नीता, रुबिना, बीना, सुरक्षा, रंजुषा आणि जेन, जीजी जॉन आणि दीपा वैद्य या दोन्ही मुख्य तिकीट निरीक्षक / कंडक्टर यांच्या अंतर्गत कार्यरत होत्या. के 99 सीएसएमटी- कल्याण लेडीज स्पेशल उपनगरीय लोकल आशियातील पहिल्या उपनगरीय मोटरवुमन मुमताज काझी आणि महिला उपनगरीय गार्ड मयुरी कांबळे यांच्या नियंत्रणात धावली.
वेळी मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांनी महिला कर्मचा-यांचे अ•िानंदन केले. यानिमित्त मुंबई विभागात अनेक ठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.