२०५ उमेदवारांनी घेतली माघार
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर बिनविरोध निवडून आलेल्या 20 जागांव्यतिरिक्त 102 जागांसाठी निवडणूक रिंगणात एकूण ४९० उमेदवार शिल्लक राहिले असून, २०५ उमेदवारांनी आपली उमेदवारी माघार घेतली आहे.
निवडणुकीपूर्वीच महायुतीचे 20 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने महायुतीचा उत्साह द्विगुणित झाला आहे. अशामध्ये आता उर्वरित 102 प्रभागातही आपले उमेदवार निवडून येण्यासाठी शिवसेना भाजपचा प्रयत्न असणार आहे.