कडोंमपाच्या प्रारूप आराखड्यावर २६४ हरकती

कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी पालिका निवडणुकीच्या चार सदस्यीय १२२ सदस्य निवडीसाठी ३२ पॅनलच्या प्रारूप आराखड्यावर एकूण २६४ हरकती दाखल झाल्या आहेत. सर्वाधिक हरकती प्रभाग रचनेबाबत आल्या आहेत.

या हरकतींवर २६ ते ३० सप्टेंबरपर्यंत सर्व सुनावण्या पूर्ण केल्या जाणार आहेत. यानंतर या प्रभाग रचना नगरविकास विभागाकडे सादर केल्या जाणार आहेत. नगरविकास विभाग राज्य निवडणूक आयोगाला त्या सादर करणार असून आयोगाच्या मान्यतेने या कालावधीत अंतिम प्रभाग रचना जाहीर करणार आहे.