ठाणे रेल्वे स्थानकात 1309 फुकटे प्रवासी पकडले

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकात आज मध्य रेल्वेने मोठी मोहीम हाती घेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या तब्बल 1309 प्रवाशांना पकडले.

मंगळवार, २६ डिसेंबर २३ रोजी ठाणे स्थानकात ५८ तिकीट तपासनीसांनी ‘मेगा ड्राईव्ह’ घेतला होता. त्यांच्यासह ‘रेल्वे प्रोटेक्शन फोर्स’चे एकूण १२ जवान सकाळपासून फलाट, पुलांवर आणि ठिकठिकाणच्या मोक्याच्या जागी तैनात होते. त्यामुळे एकूण तिकीट नसलेले 1309 प्रवासी पकडले गेले आहेत. त्यांच्याकडून एकूण दंड चार लाख 19 हजार 235 रुपये आकारण्यात आला. सरासरी तिकीट नसलेल्या २३.४ प्रवाशांना तपासनीसांनी पकडून इंगा दाखवला शिवाय एका तिकीट तपासनीसाद्वारे सरासरी दंड ७४८६ रुपये आकारण्यात आला आहे.