ठाण्यात दोन दिवसांत कोरोनाचे ११ नवीन रुग्ण

ठाणे : ठाणे शहरात सलग दोन दिवस नवीन कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. काल सहा तर आज पाच रुग्णांची भर पडली आहे, त्यामुळे ठाणेकरांना खबरदारी घ्यावी लागणार आहे.

जिल्ह्यात ठाणे महापालिका हद्दीत पाच रूग्ण सापडले आहेत इतर महापालिका, नगरपालिका आणि ठाणे ग्रामिण भागात एकही रूग्ण नोंदवला नाही.

आत्तापर्यंत सात लाख ४७ हजार ४८५जण बाधित सापडले आहेत तर जिल्ह्यात रुग्णालयात आणि घरी २१जणांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत सात लाख ३६,२६३ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर आत्तापर्यंत ११,९६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ठाणे महापालिका हद्दीत १६ सक्रिय रूग्ण आहेत. कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई येथे प्रत्येकी दोन तर ठाणे ग्रामीण भागात एक सक्रिय रूग्ण आहे.