आज दहावीचा निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा उद्या निकाल लागणार आहे. उद्या दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन दहावीचा निकाल पाहता येणार आहे. ठाणे जिल्ह्यातून एक लाख २१,२४४ विद्यार्थ्यांनी तर राज्यातून १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.

बारावीचा निकाल लागल्यानंतर 10 दिवसांच्या आत दहावीचा निकाल लागेल, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर उद्या 10 वीचा निकाल लागणार आहे. दरम्यान, यंदा राज्यातून 16 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. राज्यातील 23 हजार 492 माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली होती. तर ठाणे जिल्ह्यातून एक लाख २१,२४४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान दहावीच्या परीक्षा घेतल्या. या परिक्षेला राज्यातील जवळपास 16.11 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8.6 लाख मुले, 7.47 लाख मुली आणि 19 ट्रान्सजेंडर उमेदवारांचा समावेश होता.

निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून त्यांचे गुण ऑनलाइन पाहता येतील. विद्यार्थ्यांना खाली दिलेल्या सर्व साईटवर जाऊन निकाल पाहता येणार आहे.