डोंबिवलीच्या क्रिकेट एक्स्प्लेन्ड ॲकॅडमीत अत्याधुनिक सुविधा

ठाणे: डोंबिवलीतील क्रिकेट एक्स्प्लेन्ड ॲकॅडमीने नवीन सुविधेचे उद्घाटन २० नोव्हेंबर रोजी केले. भारताचे माजी क्रिकेटपटू विनायक माने आणि रेल्वेचे माजी क्रिकेटपटू राजू हातखमकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.

हृषिकेश पुराणिक यांनी २०१७ मध्ये क्रिकेट एक्स्प्लेन्ड ॲकॅडमी सुरू केली. हृषिकेश एक अनुभवी आणि प्रमाणित प्रशिक्षक आहेत. त्यांनी आयसीसी लेव्हल १ कोचिंग पूर्ण केले आहे. हैदराबादमधील कोचिंग बियॉन्ड, भारताच्या माजी कोचिंग स्टाफद्वारे (रवी शास्त्री, आर श्रीधर आणि भरत अरुण) चालवल्या जाणार्‍या संस्थेकडून लेव्हल ए प्रमाणपत्र पूर्ण केले आहे.

स्थापनेपासून आजपर्यंत क्रिकेट एक्स्प्लेन्ड ॲकॅडमीने अनेक चांगले खेळाडू घडवले आहेत. उदाहरणार्थ, अखिल वेणुगोपालन (केंट U15 काउंटी संघ आणि इंग्लंड U15 वयोगटातील अव्वल ५० खेळाडूंपैकी), केविन प्रभाथ (U13 केंट काउंटी संघ), आयुष आंबेकर (मुंबई U16 वयोगटातील अव्वल ५० खेळाडूंपैकी आणि यावर्षी U16 पय्याडे ट्रॉफीचा भाग), वैभवी राजा (मुंबई महिला संघ), आणि संजुला नाईक (गोवा महिला संघाची कर्णधार आणि २०२१-२२ मध्ये चॅलेंजर ट्रॉफीमध्ये भारत-डीचा भाग) यांचा समावेश आहे. याशिवाय, दरवर्षी, इतर अनेक खेळाडू  U14, U16 आणि U19 वयोगटातील एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) च्या उन्हाळी सुट्टीतील शिबिरांमध्ये निवडले जातात.

सध्या, सहा अनुभवी, कुशल आणि प्रमाणित प्रशिक्षकांखाली क्रिकेट एक्स्प्लेन्ड ॲकॅडमीमध्ये ६० खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. मुलांबरोबरच मुलींच्या प्रशिक्षणावर विशेष भर दिला जातो. ॲकॅडमीमध्ये अनेक सुविधा आहेत. उदाहरणार्थ तीन सराव खेळपट्ट्या, खेळाडूंना रात्री देखील प्रशिक्षण घेता यावे म्हणून लाईट्स, एक इनडोअर ॲस्ट्रो टर्फ, बॉलिंग मशीन, फिटनेस आणि इतर ड्रिलसाठी आउटडोअर ॲस्ट्रो टर्फ आणि ४० यार्डचे क्रिकेट मैदान. या सुविधांव्यतिरिक्त, खेळाडूंना दर आठवड्याला दोन सराव सामने खेळायला मिळतात. मुंबईतील विविध स्पर्धांमध्ये सहभाग, एमसीए संलग्न स्पर्धांमध्ये सहभाग आणि U14, U16 आणि U19 च्या खेळाडूंसाठी वर्षातून भारतात दोन क्रिकेट दौरे होतात.

बर्‍याच क्रिकेट ॲकॅडमींच्या विपरीत, क्रिकेट एक्स्प्लेन्ड ॲकॅडमी वर्षातील सर्व दिवस खुली असते. त्याची अत्याधुनिक इनडोअर सुविधा त्याच्या खेळाडूंना प्रशिक्षण घेण्यापासून थांबवत नाही. “ऑफ-सीझन म्हणजे प्रत्येक खेळाडूसाठी आपला खेळ सुधरवण्याची संधी मिळते. पावसाळ्यात सामने नसल्यामुळे त्यांना खेळावर काम करण्यासाठी वेळ मिळतो. त्यामुळे हीच वेळ आहे जेव्हा तुम्ही टेकनिक आणि रणनीती यावर काम कराल. त्याचबरोबर मागील सामन्यांतील व्हिडिओंचे विश्लेषण करून पुढील सिझनसाठी तुमच्या गेममध्ये कसा बदल केला जाऊ शकतो याचा अभ्यास कराल,” असे हृषीकेश सांगतात.

हृषीकेश पुढे हे ही स्पष्ट करतात कि, “मला माझ्या विद्यार्थ्यांसाठी ती व्यक्ती व्हायची आहे ज्याची मला लहान असताना सर्वात जास्त गरज होती. मी प्रयत्न करतो कि मी त्यांच्यासाठी नेहमी उपलब्ध राहीन आणि त्यांच्या गरजा पूर्ण करीन. वसंत तांडेल माझे प्रशिक्षक होते. त्यांनी त्यांची भूमिका बजावली आणि त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. परंतु एक मेंटॉरची कमी मला तेव्हा भासली. मला विश्वास आहे की मी आता माझ्या विद्यार्थ्यांसोबत दोन्ही भूमिका निभावत आहे आणि त्यांचे करिअर घडवत आहे.”