जिल्हा

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना झी समूहाचा 'युवा नेतृत्व' पुरस्कार

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना झी समूहाचा 'युवा नेतृत्व' पुरस्कार
खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना झी समूहाचा 'युवा नेतृत्व' पुरस्कार फोटो: ठाणे वैभव
कल्याण : इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांमध्ये भारतात अग्रगण्य असलेल्या झी समूहातर्फे नुकताच मुंबई येथे 'झी युवा सन्मान २०२३ ' या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना ' युवा नेतृत्व ' पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने राज्यभरात सुरु असलेली लोकसेवेची कामे तसेच लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या विविध विकासकामांची दखल घेऊन खासदार डॉ. शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. झी एंटरटेमेंटचे चीफ क्लस्टर ऑफिसर (वेस्ट नॉर्थ अँड प्रीमियम) अमित शाह यांच्या हस्ते खासदार डॉ.शिंदे यांना हा पुरस्कार देण्यात आला. डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाच्या सर्व स्वयंसेवकांना हा पुरस्कार समर्पित करत असल्याच्या भावना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी पुरस्कार सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना केल्या. राज्यभरात या दोन्ही मदत कक्षांतर्फे गरजू नागरिकांची आणि रुग्णांची सेवा केली जाते. गरजू रुग्णांना योग्य पद्धतीचे उपचार मिळवून देण्यासाठी सर्व स्वयंसेवक अहोरात्र मेहनत घेत असतात. यामुळे या पुरस्काराचे खरे मानकरी ते आहेत, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तर विविध क्षेत्रात आपल्या कार्यातून जनसेवा तसेच राष्ट्रसेवा करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना झी समूहाने या पुरस्काराच्या माध्यमातून एक उत्तम व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. यामुळे अनेकांना समाजासाठी उत्तम कार्य करण्याची प्रेरणा मिळत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475