जिल्हा

डोंबिवलीत पारंपरिक वेशभूषेत तरुणाईचा उत्साह

डोंबिवलीत पारंपरिक वेशभूषेत तरुणाईचा उत्साह
डोंबिवलीत पारंपरिक वेशभूषेत तरुणाईचा उत्साह फोटो: ठाणे वैभव
ढोल-ताशाच्या गजरात निघाली स्वागतयात्रा कल्याण: गुढीपाडव्याला निघणारी शोभायात्रा ही डोंबिवलीची सांस्कृतिक ओळख असून हिंदू नववर्षाच्या निमित्ताने शोभायात्रा काढण्याची परंपरा डोंबिवलीतूनच सुरु झाली होती. श्री गणेश मंदिर आणि स्वागतयात्रा संयोजन समिती यांच्या वतीने आयोजित नववर्ष स्वागत यात्रेचे यंदाचे २८ वे वर्ष असल्याने तरुणाईचा उत्सव मोठ्या मोठ्या प्रमाणात दिसून आला. यंदाची स्वागतयात्रा 'वंदे मातरम्'च्या १५० व्या वर्षाच्या विशेष संकल्पनेवर आधारित असून विविध धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राष्ट्रभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले होते. ढोल-ताशांच्या गजरात, नऊवारी साडी, डोक्यावर फेटे, गॉगल आणि कुर्ता पैजामा परिधान करून पारंपरिक वेशभूषेत मोठ्या उत्साहात डोंबिवलीतील फडके रोडवर गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यात तरुणाई बहरली होती. तर ढोलताशाच्या गजराने फडके रोड परिसर संपूर्ण दणाणून गेला होता. आज सकाळी सहा वाजता गणेश मंदिर संस्थानांमधून पालखीची केडीएमसी महापालिका आयुक्त अभिनव गोयल आणि आणि मंदिराचे विश्वस्त यांच्या हस्ते विधीवत पूजा करून डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदान येथे पालखी नेण्यात आली. त्यानंतर सकाळी साडेसात वाजता भाग शाळा मैदानातून ठाणे पोलीस आयुक्त अशितोष डुंबरे, महापालिका आयुक्त अभिनव गोयल, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण, राजेश मोरे, मंदिराचे विश्वस्त अलका मुतालिक, प्रवीण दुधे, राहुल दामले आदी लोकप्रतिनिधी आणि सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून नववर्ष स्वागत यात्रेला प्रारंभ झाला. भागशाळा मैदान, पंडित दीनदयाल पथ, द्वारका हॉटेल, रेल्वे मार्ग, शिवमंदिर पथ, राजेंद्र प्रसाद पथ, चार रस्ता मानपाडा पथ, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (घरडा सर्कल), बाजीप्रभू चौक, फडके पथ आणि आप्पा दातार चौक या मार्गे पालखी नंतर श्री गणेश मंदिर पालखी नेऊन विधीवत पूजा करून नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली. यंदाच्या नववर्ष स्वागत यात्रेत सुमारे 100 च्या आसपास संस्था सहभागी झाल्या होत्या. स्वागत यात्रेत सहभागी झालेली चित्ररथांमध्ये डोंबिवलीकरचा वंदे मातरम आधारित, खासदार श्रीकांत शिंदे यांचा विकास योजना रथ, स्वा. सावरकर सामाजिक संस्था, कोकण कुणबी, स्वकुल साळी समाज, योग विद्या धाम, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माहिती देणारा रथ लक्ष वेधून घेत होते. यावेळी शोभायात्रेत शहरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थांनी सहभाग घेतला होता. पारंपरिक मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या कलापथकांबरोबरच सामाजिक जनजागृती करणारे अनेक चित्ररथही यात सहभागी झाले होते.गुढीपाडव्याच्या या शोभायात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. मार्गभर नागरिकांनी शोभायात्रेचे स्वागत करत विविध चित्ररथांचे कौतुक केले. अनेक ठिकाणी शोभ यात्रेत चालत येणाऱ्या सहभागी व्यक्तींना पाणी, सरबत, खाऊ वाटप करण्यात येत होते. तर अनेक ठिकाणी शोभ यात्रा ज्या वाटेवरून जात होती त्या ठिकाणी पुष्पवृष्टी देखील सुरू होती. यामध्ये माजी नगरसेवक शैलेश धात्रक, माजी नगसेविका मनीषा धात्रक यांनी उभारलेल्या व्यासपीठावर सर्व चित्र रथ, सर्व संस्था आणि सर्वच राजकीय पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांचे स्वागत करण्यात आले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475