जिल्हा
चिखलोली धरणात बुडून तरुणाचा मृत्यू
चिखलोली धरणात बुडून तरुणाचा मृत्यू
फोटो: ठाणे वैभव
अंबरनाथ : मित्रांसोबत आलेला अविनाश भोईर (30) हा चिखलोली धरणात बुडून मरण पावल्याची आज सोमवारी घटना घडली.
अग्निशमन दलातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार कल्याण येथून अविनाश भोईर हा मित्रांसोबत चिखलोली धरणात पोहण्यासाठी आला होता. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडून मरण पावला. याची माहिती मिळताच अंबरनाथ अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अविनाश भोईर याची शोध मोहीम घेऊन त्याला पाण्याबाहेर काढले आणि शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात त्याचा मृतदेह देण्यात आल्याचे अग्निशमन दलप्रमुख भागवत सोनोने यांनी सांगितले.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475