महाराष्ट्र

बॅरेज धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

बॅरेज धरणात बुडून तरुणाचा मृत्यू
बॅरेज धरणात बुडून तरुणाचा मृत्यू फोटो: ठाणे वैभव
बदलापूर : धरणात बुडणाऱ्या दोन मुलांना वाचणाऱ्या १७ वर्षीय तरुणाचा बॅरेज धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना बदलापुरात घडली. अनुज गोसावी असे मयत तरुणाचे नाव असून तो परळ, मुंबई येथे राहणारा आहे. अनुज गोसावी हा १७ वर्षीय तरुणही मित्रांसह इथे आला होता. दुपारी १ च्या सुमारास बॅरेज येथे आलेल्या तरुणांच्या गटापैकी एका ग्रुपमधील दोन जण पाण्यात पोहत असताना बुडू लागले. त्यांना वाचण्यासाठी अनुजने पाण्यात उडी घेतली आणि त्या दोघांना पाण्याबाहेर काढले. मात्र दुसऱ्या तरुणाला बाहेर काढताना तो स्वतःच पाण्यात बुडाला. याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुमारे तीन तास शोध मोहीम राबविल्यानंतर या तरुणाचा मृतदेह अग्निशमन दलाच्या हाती लागल्याची माहिती अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने यांनी दिली. कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या मांजर्ली अग्निशमन केंद्रातील फायरमन प्रदीप जाधव, वाहनचालक विजय ढोक, मदतनीस दीपक जाधव, गणेश धुळे, किरण ढिले, नामदेव मेहेर, जगन्नाथ नवले आदींनी बोटीच्या साहाय्याने या तरुणाचा शोध घेतला.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475