महाराष्ट्र

विजेच्या खांब्याचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

विजेच्या खांब्याचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू
विजेच्या खांब्याचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू फोटो: ठाणे वैभव
उल्हासनगर: उल्हासनगर कॅम्प 5 झूलेलाल बाजार येथील मंगलमूर्ती गल्लीत सतगुरू्स गाऊन सेंटरच्या समोर एक विजेचा खांब आहे. या विजेच्या खांबाला हात लागल्याने राकेश गेलानी नामक व्यक्तीचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. राकेश गेलानी ही व्यक्ती दुपारच्या सुमारास गल्लीतून जात असताना सदगरूस गाऊन सेंटरच्या समोर विजेच्या खांबाला आधार घेण्यासाठी गेला असता राकेशला विजेचा शॉक लागला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे राकेशने जीव गमावला असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. घटनेची माहिती मिळताच हिललाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून राकेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475