जिल्हा

तरुणाचा पोलीस ठाण्यात धिंगाणा; 6 जणांना अटक

तरुणाचा पोलीस ठाण्यात धिंगाणा; 6 जणांना अटक
तरुणाचा पोलीस ठाण्यात धिंगाणा; 6 जणांना अटक फोटो: ठाणे वैभव
डोंबिवली : रात्रीच्या वेळी रस्त्यात कारटेप लागल्याने नागरिकांना त्रास होत असल्याने पोलिसांनी टेप बंद करा असे सांगून निघून गेले. याचा राग आल्याने संतापलेल्या सहाजणांनी थेट टिळकनगर पोलीस ठाणे गाठले. या तरुणांनी पोलिसांना जाब विचारत धिंगाणा घातल्याने पोलिसांनी तरुणांवर गुन्हा नोंदवून अटक केली. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार. विलास भुजंग, राजू भुजंग, सिद्धार्थ गायकवाड, आकाश पांडे, प्रशांत भालेराव आणि निलेश सुरंगे या सहाजणांना पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी रात्री उशीरा या सहाजणांनी रस्त्यावर कारटेपचा मोठा केला. याचा त्रास झाल्याने पोलीस कंट्रोल रूमला कॉल केला. टिळकनगर पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन तरुणांना कार टेप बंद करण्यास सांगून निघून गेले. याचा राग आल्याने हे तरुण टिळकनगर पोलीस ठाण्यात गेले. कार टेप का बंद केला असा जाब विचारून पोलीस ठाण्यात धिंगाणा घातला.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475