जिल्हा

भिवंडीत नाल्यात वाहून गेला चिमुकला

भिवंडीत नाल्यात वाहून गेला चिमुकला
भिवंडीत नाल्यात वाहून गेला चिमुकला फोटो: ठाणे वैभव
भिवंडी: मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर कायम असून काही ठिकाणी दुर्घटना घडत आहेत. भिवंडी शहरात 13 वर्षीय मुलगा नाल्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भिवंडीत आपल्या मित्रांबरोबर नाल्याशेजारी खेळायला गेलेला मुलगा पावसाच्या वाहत्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. त्याच्यासोबत खेळणाऱ्या मित्रांकडून हा मुलगा नाल्यात वाहून बेपत्ता झाल्याचे समजताच परिसरात खळबळ उडाली. स्थानिकांनी तत्काळ धाव घेत प्रशासनाला संपर्क साधला. मोहम्मद अन्सारी (13) असे नाल्यात वाहून गेलेल्या मुलाचे नाव आहे. अग्निशमन दल आणि मनपा आपत्कालीन पथकाकडून मुलाचा शोध सुरू असून मुलाच्या सुरक्षित असण्यासाठी प्रार्थना केली जात आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475