जिल्हा

योगीराज श्री गगनगिरी महाराज गुरुपौर्णिमा महोत्सव

योगीराज श्री गगनगिरी महाराज गुरुपौर्णिमा महोत्सव
योगीराज श्री गगनगिरी महाराज गुरुपौर्णिमा महोत्सव फोटो: ठाणे वैभव
खोपोली : सालाबादप्रमाणे याही वर्षी विश्वविख्यात योगीराज गगनगिरी महाराज यांचा गुरुपौर्णिमा महोत्सव, त्यांच्या लाखो भाविकांतर्फे खोपोली आश्रमस्थानी साजरा करण्यात येणार आहे.
मंगळवार २८ जुलैपासून उत्सवास प्रारंभ होणार असून सांगता गुरूवार ३० जुलै रोजी होणार आहे. उत्सवात भजन, कीर्तन, प्रवचन, नामस्मरण, होमहवन, भंडारा आदी धार्मिक कार्यक्रमांचे भव्य प्रमाणावर आयोजन करण्यांत आले आहे.
२९ जुलै रोजी पहाटे ४ पासून श्रींचे मूर्तीला वेदमंत्राच्या पवित्र घोषात मंगल अभिषेक करण्यांत येणार असून पादुकांची पूजा, अभिषेक आणि समाधीस्थानी फुलांची सजावट करण्यात येईल. सकाळी ६ वाजता दर्शनास प्रारंभ होऊन ८.३० वाजता महाआरती होईल. भाविक भक्तांच्या सोईसाठी सकाळी १०पासून भक्तांना महाप्रसाद देण्यात येईल. उत्सवाची सांगता होम-हवनाने होणार आहे. भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने दर्शन-आशिर्वादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यांत आले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475