महाराष्ट्र

वाशीतील एपीएमसी बाजारात पिवळा कलिंगड दाखल

वाशीतील एपीएमसी बाजारात पिवळा कलिंगड दाखल
वाशीतील एपीएमसी बाजारात पिवळा कलिंगड दाखल फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: कलिंगड म्हटलं की डोळ्यासमोर लाल गर असलेला फळ दिसतो, मात्र बाजारात आता पिवळा गर असलेला कलिंगड देखील दाखल होत आहे. वाशीतील एपीएमसी बाजारात पिवळ्या कलिंगडाची आवक वाढली आहे. पिवळे कलिंगड आरोग्याला पोषक असल्याचे व्यापारी सांगतात. हे कलिंगड चवीला गोड आहेत. पिवळ्या कलिंगडाची आवक केवळ तीन महिनेच राहणार आहे. याला ग्राहकांची मोठी पसंती मिळू लागली आहे. बाजारात सोलापूरमधून रोज दहा ते अकरा टन पिवळा कलिंगड दाखल होत आहे. दरम्यान एपीएमसी बाजारात लाल कलिंगडाचे दर १६ ते १७ रुपये किलो तर पिवळ्या कलिंगडाला बाजारात दुप्पट म्हणजे किलोमागे ३० ते ३५ रुपये दर मिळत आहे, अशी माहिती येथील व्यापाऱ्यांनी दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475