जिल्हा

यार्डात उभ्या एक्स्प्रेसच्या डब्याला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली

यार्डात उभ्या एक्स्प्रेसच्या डब्याला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली
यार्डात उभ्या एक्स्प्रेसच्या डब्याला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली फोटो: ठाणे वैभव
अंबरनाथ: बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेर यार्डात उभ्या असलेल्या एक्स्प्रेस गाडीच्या डब्याला भीषण आग लागून डबा जळून खाक झाल्याची घटना बदलापूरमध्ये मध्यरात्री घडली. सुदैवाने जीवितहानी टळली आहे. बदलापूर रेल्वे स्थानक परिसरात यार्डात साईडिंगला उभ्या असलेल्या एका एक्सप्रेस गाडीच्या डब्याला शुक्रवारी (1) मार्च रोजी एक वाजताच्या दरम्यान एक्सप्रेसगाडीच्या डब्याला आग लागली. एक्स्प्रेस गाडीच्या डब्याला आग लागल्याची माहिती तत्काळ बदलापूर रेल्वे प्रशासनाने एक वाजून वीस मिनिटांनी अग्निशामन दलाला कळवले. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळावर दाखल झाली आणि त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले. तब्बल तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले, मात्र या भीषण आगीत एक्सप्रेस गाडीचा संपूर्ण डब्बा जळून खाक झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली आहे. आग नेमकी कशी लागली, याचा तपास रेल्वे प्रशासन करत आहे. या आगीच्या घटनेत कोणालाही इजा झाली नसली तरी काही वेळासाठी रेल्वेसेवा थांबवण्यात आली होती.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475