महाराष्ट्र

आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांत विधानभवनात राडा

आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांत विधानभवनात राडा
आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांत विधानभवनात राडा फोटो: ठाणे वैभव
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. विधानभवनाच्या लॉबीतच दोघांचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण झाली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. काल देखील जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये वाद झालेला होता. कालचा वाद हा शिवागाळ करण्यापर्यंत होता. मात्र, आज विधानभवनाच्या लॉबीतच जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. यामुळे विधानभवन परिसरात काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या विधानभवनाच्या लॉबीत झालेल्या मारहाणीचा मुद्दा विधानसभेत देखील गाजला. अनेक आमदारांनी चिंता व्यक्त केली आहे. पहिल्यांदा पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले. आम्हाला याच्यापेक्षा जास्त पुरावा देण्याची गरज नसल्याचे आव्हाड म्हणाले. जर तुम्ही विधानसभेत गुंडाना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर कोणतेच लोक सुरक्षीत नाहीत असे आव्हाड म्हणाले. दरम्यान, या घटनेनंतर प्रसारमाध्यमांनी गोपीचंद पडळकर यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी मला याबाबत काही माहिती नसल्याचे वक्तव्य पडळकर यांनी केले आहे. पडळकरांविरोधात मुंब्र्यात निदर्शने मुंब्रा येथे सय्यद अली अश्रफ, शमीम खान आणि शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली गोपीचंद पडळकर यांच्याविरुद्ध जोरदार हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून तसेच त्यांचे छायाचित्र पायाखाली तुडवून निषेध करण्यात आला. पडळकर यांच्यावर पोलीस कारवाई करावी तसेच त्यांनी जाहीर माफी मागावी; अन्यथा, शहरातील चौकाचौकात त्यांचे पुतळे जाळू, असा इशारा कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्राध्यक्ष शमीम खान यांनी दिला.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475