जिल्हा

सराफांची फसवणूक करणारी महिला जेरबंद

सराफांची फसवणूक करणारी महिला जेरबंद
सराफांची फसवणूक करणारी महिला जेरबंद फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ऑनलाईन पेमेंट केल्याचा बनावट मेसेज पाठवून सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या भामट्या महिलेला ठाणे नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या महिलेने इतर शहरात देखील असे गुन्हे केल्याचे तपासात उघड झाले आहे. धवणी गोर (३१) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तलावपाळी येथिल यश ज्वेलर्समध्ये १९ सप्टेंबर रोजी दुपारी ही महिला सोने खरेदी करण्यासाठी आली होती. तिने ४.१०० मि.ग्राम वजनाचा दागिना खरेदी करून यश ज्वेलर्सच्या बँक खात्यावर ४९ ७०० रुपये पाठवल्याचा खोटा मेसेज दाखवून ती महिला सोन्याचा दागिना घेऊन फरार झाली होती. याबाबत दुकानाचे मालक उदय पोवळे यांनी ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी सीसी टीव्ही फुटेजच्या मदतीने या महिलेला ७ डिसेंबर रोजी अटक केली. चौकशी दरम्यान तिने गुन्हा कबूल केला. अशा प्रकारचा गुन्हा वाशी आणि भाईंदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत केल्याची कबुली देखील या महिला आरोपीने दिली आहे. ठाणे नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य पोलिस उपनिरीक्षक भारत मारकड, पोलिस हवालदार महेश सूर्यवंशी, आशिष कांबळे, सचिन पाचपुते आणि पोलिस शिपाई अंगद काळे यांच्या पथकाने या महिलेला बेड्या ठोकल्या. या गुन्ह्याचा पुढील तपास ठाणे नगर पोलिस करत आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475