जिल्हा

लेप्रोस्कॉपी सुरु असताना महिलेचा मृत्यू

लेप्रोस्कॉपी सुरु असताना महिलेचा मृत्यू
लेप्रोस्कॉपी सुरु असताना महिलेचा मृत्यू फोटो: ठाणे वैभव
रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप कल्याण : मुल होत नसल्याने व्हिडीओ हिस्ट्रो लेप्रो स्कोपीसाठी खाजगी रुग्णालयात गेलेल्या महिलेचा लेप्रोस्कॉपी सुरु असताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली. कल्याण अपेक्स रुग्णालयात हा प्रकार घडला. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला, तर दुसरीकडे रुग्णालयातील डॉक्टर मानसी घोसाळकर यांनी मात्र आरोपांचे खंडन केले. महिलेला वाचवण्यासाठी आम्ही शर्थिचे प्रयत्न केले, पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण समजेल असे त्यांनी स्पष्टीकरण दिले. विक्रोळी येथे राहणाऱ्या महिलेला मुल होत नसल्याने उपचारासाठी कल्याण येथे आपल्या आई-वडिलांकडे आल्या होत्या. त्यांच्यावर कल्याण अपेक्स रुग्णालयात उपचार सुरु होते. आज सकाळी आपल्या आईसोबत त्या रुग्णालयात आल्या. काल सकाळी व्हिडीओ हिस्ट्रो लेप्रोस्कॉपी होणार होती. सकाळीच महिला रुग्णालयात दाखल झाली. लेप्रोस्कॉपी सुरु असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि तासभरात त्यांचा मृत्यू झाला. महिलेचा मृत्यू झाल्याचे कळताच तिच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्या मृत्यू झाल्याचे आरोप केला. नातेवाईकांनी मृतदेह घेण्यास नकार दिला. बाजारपेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. दुसरीकडे रुग्णालयातील डॉक्टर मानसी घोसाळकर यांनी मात्र आरोपांचे खंडन केले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475