जिल्हा

ॲप्लाइड क्लाउडने छाटले 'विहंग'चे पंख

ॲप्लाइड क्लाउडने छाटले 'विहंग'चे पंख
ॲप्लाइड क्लाउडने छाटले 'विहंग'चे पंख फोटो: ठाणे वैभव
ठाणेवैभव क्रिकेट करंडक स्पर्धा ठाणे: ॲप्लाइड क्लाउड कॉम्प्युटिंग प्रा. लि. संघाच्या ओंकार सावंतने पाच आणि देवकिरण चेट्टी याने तीन गडी बाद करत विहंग इंटरप्रायजेस संघाला अवघ्या ७८ धावांत गुंडाळले. तर ॲप्लाइड क्लाउडच्या समुएद व्यवत्रे याने २४ चेंडूंत ५१ धावा फटकावत संघाला विजय मिळवून दिला. ठाणेवैभव क्रिकेट करंडक स्पर्धेतील आजचा सामना एकतर्फी ठरला. ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक चंद्रशेखर करमळकर यांनी नाणेफेक केली. विहंग इंटरप्रायजेसने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र संघाच्या सर्व फलंदाजांनी घोर निराशा केली. सहा फलंदाजांनी एक आकडी धावसंख्या करून तंबूचा रस्ता धरला तर चार फलंदाजांनी अवघ्या ४७ धावांचे योगदान दिले. ॲप्लाइड क्लाउड कॉम्प्युटिंग प्रा. लि. संघाच्या गोलंदाजांच्या आक्रमकतेपुढे विहंग इंटरप्रायजेसचा संघ सर्व बाद ७८ धावांत ढेपाळला. ॲप्लाइड क्लाउड संघाच्या ओंकार सावंत याने सात षटकांत २१ धावा देत पाच गडी बाद केले. तरu देवकिरण चेट्टी याने २६ धावा देत तीन गडी बाद केले. अजिंक्य पवार याने १२ धावांच्या बदल्यात दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. 'विहंग'चे किरकोळ आव्हान ॲप्लाइड क्लाउड संघाने सहज परतवून लावले. समुएद व्यवत्रे याने दोन षटकार आणि नऊ चौकारांच्या मदतीने २४ चेंडूंत ५१ धावा फटकावल्या तर वैभव मुजागे याने याने नाबाद २६ धावा केल्या. ॲप्लाइड क्लाउड संघाने हा सामना अवघे दोन गडी गमावून जिंकला. ओंकार सावंत हा सामनावीर ठरला.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475