जिल्हा

उथळसर-नौपाडा भागात सोमवारी पाणीपुरवठा बंद

उथळसर-नौपाडा भागात सोमवारी पाणीपुरवठा बंद
उथळसर-नौपाडा भागात सोमवारी पाणीपुरवठा बंद फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील उथळसर प्रभाग समिती अंतर्गत सिध्देश्वर जलकुंभ येथे नवीन जलकुंभाचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामामुळे कोलबाड परिसरात पाणी पुरवठा करणारी मुख्य पाणी पुरवठा वाहिनी बाधित होत असल्याने ही जलवाहिनी स्थलांतरीत करणे आवश्यक आहे. या ६०० मिमी व्यासाच्या जलवाहिनी स्थलांतराचे काम सोमवार १० नोव्हेंबर, २०२५ रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे, सोमवार १० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते मंगळवार ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत असे एकूण २४ तास या जलवाहिनीवरील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या शटडाऊन कालावधीत उथळसर प्रभाग समितीमधील सिध्देश्वर तलाव परिसर, माता रमाबाई आंबेडकर नगर, गणेश वाडी, नितीन कंपनी, पाचपाखाडी, हंसनगर, सिंगनगर, खोपट, फ्लॉवर व्हॅली, शेलार पाडा, गोकुळदास वाडी, कोलबाड, गोकुळ नगर परिसर व नौपाडा प्रभाग क्षेत्रातील पाचपाखाडी, चंदनवाडी, महापालिका मुख्यालय परिसर, चरई, धोबीआळी इ. भागात २४ तासासाठी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहील. मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०२५ रोजी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. या पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा काटकसरीने वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475