जिल्हा

ठाण्याच्या काही भागात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद

ठाण्याच्या काही भागात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद
ठाण्याच्या काही भागात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद फोटो: ठाणे वैभव
ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रात अत्यंत महत्त्वाचे देखभाल आणि दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे, कटाई नाका ते ठाणे या दरम्यान गुरूवार २४ एप्रिल, २०२५ रोजी रात्री १२ वाजल्यापासून शुक्रवार २५ एप्रिल, २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत एकूण २४ तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. परिणामी, ठाणे महानगरपालिका क्षेत्रात, दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ व ३१ चा काही भाग वगळून) आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये, वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसन नगर नं. २, नेहरू नगर तसेच माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीअंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा २४ तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. या पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475