जिल्हा

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात पाणी तुंबले

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात पाणी तुंबले
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात पाणी तुंबले फोटो: ठाणे वैभव
कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतमालाची सततच्या दोन-तीन दिवसांच्या पावसामुळे आवक घटली. बाजार समितीत पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे तीन दिवसांपासून घाऊक, किरकोळ खरेदीदारांनी भाजीपाला, फळ भाज्या, फळे, फुले घेण्यासाठी पाठ फिरविल्याचे दिसत होते. तर शेतमालाची आवक घटल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती वसुली उत्पन्न अर्ध्यावर आल्याने बाजार समितीला देखील फटका बसला आहे. गेले तीन दिवस कल्याण शहरात पडलेल्या पावसाचा फटका कृषी उत्पन्न बाजार समिती आवाराला बसला. यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील रस्त्यावर ढोपरभर पाणी साचल्याने पाणी आणि चिखलाचे साम्राज्य दिसून येत होते. अखेर कृषी उत्पन्न बाजार समितीने जेसीबी लावून पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग मोकळा करीत साचलेल्या पाण्याला मार्ग करून दिला. पंरतु आज देखील कृषी उत्पन्न बाजार समितीला ढोपरभर पाण्याचा वेढा पाहता मार्केट परिसरातील सोयी सुविधा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे दिसत आहे. याच कारणामुळे किरकोळ खरेदीदार कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डात खरेदीसाठी पाठ फिरवत असल्याचे दिसत आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475