जिल्हा
जलवाहिनी फुटल्याने नवी मुंबईत दिवसभर पाणी खंडित
जलवाहिनी फुटल्याने नवी मुंबईत दिवसभर पाणी खंडित
फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामध्ये पाणीपुरवठा करणारी मोरबे धरणाची २०४२ मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी मार्बल मार्केट कळंबोली येथे सकाळच्या सुमारास फुटली. त्यामुळे भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रास होणारा पाणीपुरवठा दुरुस्ती कामासाठी तातडीने खंडित करण्यात आला होता.
मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू होते. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रास व सिडको क्षेत्रातील खारघर व कामोठे येथे होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. दुरुस्तीचे काम झाल्यानंतर शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे व नवी मुंबई महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले होते.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475