जिल्हा

प्रभाग समित्या झाल्या; आता ढोल स्वीकृतांचे!

प्रभाग समित्या झाल्या; आता ढोल स्वीकृतांचे!
प्रभाग समित्या झाल्या; आता ढोल स्वीकृतांचे! फोटो: ठाणे वैभव
स्थायी समिती, परिवहन समिती आणि विषय समित्या लागणार मार्गी ठाणे : मागिल सहा महिन्यांपासून रखडलेल्या ठाणे महापालिकेच्या प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुकीला मुहूर्त मिळाल्यानंतर आता स्वीकृत नगरसेवक, स्थायी समिती, परिवहन समिती आणि विविध विषय समित्यांच्या नियुक्त्यांसाठी महापालिकेत हालचाली सुरु झाल्या आहेत. पुढील महिन्यात या नियुक्त्या होण्याची शक्यता असल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पालिकेच्या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर समित्यांची स्थापना लवकर होईल, अशी अपेक्षा होती. परंतु महायुतीमधील समन्वयाच्या अभावामुळे सर्वच समित्यांच्या नियुक्त्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. काल प्रभाग समित्यांच्या सभापतींची निवड पूर्ण झाल्याने उर्वरित समित्यांच्या स्थापनेतील अडथळे दूर झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा पदवाटपाच्या चर्चांना वेग आला आहे. महापालिकेत यावेळी दहा स्वीकृत सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यानुसार सर्वाधिक ७५ नगरसेवकांचे संख्याबळ असलेल्या शिंदे गटाला सर्वाधिक सहा, भाजपला दोन आणि राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांना प्रत्येकी एक जागा मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. स्वीकृत सदस्यपदाचा कार्यकाळ मर्यादित असला तरी या पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. निवडणुकीत पराभूत झालेले काही माजी नगरसेवक तसेच पक्ष संघटनेत सक्रिय असलेले पदाधिकारी स्वीकृत सदस्यत्वाच्या माध्यमातून महापालिकेत पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेले पडद्यामागील प्रयत्न आता अधिक वेगाने सुरू झाल्याचे दिसत आहे. स्थायी समिती सदस्यपदासाठीही सत्ताधारी पक्षातील अनेक जण इच्छुक आहेत. प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या वाटपात संधी न मिळालेल्यांचे पुनर्वसन स्थायी समितीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, काही नगरसेवकांना अपेक्षित समितीऐवजी अन्य जबाबदारी मिळाल्याने त्यांच्यातही नाराजी असल्याची चर्चा आहे. परिवहन, शिक्षण, वृक्ष प्राधिकरण आणि इतर विषय समित्यांतील सदस्यपदांसाठीही इच्छुकांकडून पक्ष नेतृत्वाकडे जोरदार पाठपुरावा सुरू आहे.

संबंधित बातम्या

Advertisement 300x450

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement 300x600