जिल्हा

शहापुरात एसटी गाड्यांची वानवा; बस वाढवण्याची मागणी

शहापुरात एसटी गाड्यांची वानवा; बस वाढवण्याची मागणी
शहापुरात एसटी गाड्यांची वानवा; बस वाढवण्याची मागणी फोटो: ठाणे वैभव
शहापूर: शहापूर तालुक्यात सध्या एसटी बसची कमतरता प्रकर्षाने जाणवत असून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. डोळखांब, टाकीपठार, मुरबाड मार्गांवर बस उशिराने येत असल्याने तसेच काही वेळा बस रद्द होत असल्याने प्रवाशांना तासनतास बसस्थानकावर किंवा रस्त्याच्या कडेला ताटकळत उभे राहावे लागत आहे. शहापूरहून मुरबाड, किन्हवली, डोळखांब तसेच ग्रामीण भागातील गावांकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्या अपुरी असल्याची तक्रार प्रवाशांकडून वारंवार केली जात आहे. सकाळी कामावर, शाळा-महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, कामगार आणि नोकरदार वर्गाला याचा सर्वाधिक फटका बसत आहे. बस वेळेवर न येणे, काही फेऱ्या रद्द होणे आणि प्रवाशांची वाढती गर्दी यामुळे प्रवाशांना प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही वेळा बसमध्ये प्रचंड गर्दी होत असल्याने प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागत असल्याचीही परिस्थिती आहे. दरम्यान शहापूर बसस्थानकातून विविध मार्गांवर एसटीच्या फेऱ्या वाढवाव्यात तसेच बसचे वेळापत्रक नियमित ठेवावे, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. याबाबत एसटी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून अतिरिक्त बस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475