महाराष्ट्र

दिव्यांग आणि ज्येष्ठांचे मतदान होणार सोपे

दिव्यांग आणि ज्येष्ठांचे मतदान होणार सोपे
दिव्यांग आणि ज्येष्ठांचे मतदान होणार सोपे फोटो: ठाणे वैभव
‘सक्षम’मोबाईल’अ‍ॅप तयार ठाणे : आगामी लोकसभा निवडणुकीत दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना सुलभतेने मतदान करता येण्यासाठी निवडणूक आयोगाने ‘सक्षम’ नावाचे ‘मोबाईल अ‍ॅप’तयार केले आहेत. या ‘अ‍ॅप’वर दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्व गरजू मतदारांनी स्वत:च्या मोबाईलमध्ये ‘सक्षम पीसीआय’ हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यास त्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम दिव्यांग मतदारांना आपल्या मोबाईलमध्ये सक्षम ‘अ‍ॅप’ डाऊनलोड करून घ्यावे लागणार आहे. त्यानंतर दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना त्यांचे नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती या अ‍ॅपमध्ये भरावी लागणार आहे, अशी माहिती ठाणे निवडणूक संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी दिली. त्यानंतर दिव्यांग आणि वयोवृद्ध नागरिकांना या ‘सक्षम’द्वारे मतदानाच्या दिवशी मतदानासाठी लागणा-या मदतीचीही मागणी नोंदविता येणार आहेत. त्याद्वारे मतदार संघातील दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना त्यांच्या मतदानाच्या मतदारसंघात आणि स्थान निश्चिती यंत्रणेला करणे शक्य होणार आहे. याद्वारे नोंदणी झाल्यानंतर दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ‘ने आणि आणण्यासाठी’ वाहतूक व्यवस्था, सहाय्यक मदतनीस आदी प्रकारच्या सुविधा या ‘अ‍ॅप’च्या माध्यमातून मिळणार आहेत. ‘सक्षम अ‍ॅप’मध्ये अनेक सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. त्या अ‍ॅपमध्ये मोठी अक्षरे आणि चांगली रंगसंगती असल्यामुळे दिव्यांगांसाठी वापर करणेही अत्यंत सुलभ होणार आहे, असेही निवडणूक अधिका-याने सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475