जिल्हा

ठामपा उपायुक्तपदी पिंपरी-चिंचवडचे उमाकांत गायकवाड

ठामपा उपायुक्तपदी पिंपरी-चिंचवडचे उमाकांत गायकवाड
ठामपा उपायुक्तपदी पिंपरी-चिंचवडचे उमाकांत गायकवाड फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाणे महापालिकेच्या उपायुक्त पदी पिंपरी-चिंचवड येथील उपायुक्त उमाकांत गायकवाड यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यालय उपायुक्त मारुती खोडके हे मागील महिन्यात निवृत्त झाले आहेत, त्यामुळे महापालिकेत उपायुक्त पदाच्या प्रतिनियुक्तीवरील जागा रिक्त होती. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी उपायुक्त पद भरण्याची विनंती राज्य सरकारला केली होती. आज नगरविकास विभागाने उमाकांत गायकवाड यांची दोन वर्षाकरिता ठाणे महापालिकेत प्रतिनियुक्तीने बदली करण्यात आली असल्याचे अवर सचिव ए.के. लक्कस यांनी सूचित केले आहे. ठाणे महापालिकेत प्रतिनियुक्तीवरील उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची सहा पदे असून प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांची दोन पदे रिक्त आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475