महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंचे २१ उमेदवार जाहीर

उद्धव ठाकरेंचे २१ उमेदवार जाहीर
उद्धव ठाकरेंचे २१ उमेदवार जाहीर फोटो: ठाणे वैभव
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आतापर्यंत 21 उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवसेना ठाकरे गटाने आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून यामध्ये चार नावांचा समावेश आहे. त्याआधी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारांच्या पहिल्या यादीत 17 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. आतापर्यंत ठाकरे गटाने 21 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये बहुचर्चित लढत असलेल्या कल्याण मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. हातकणंगलेमधून सत्यजित पाटील आणि पालघरमधून भारती कामडी यांना उमेदवारी जाहीर करण्यता आली आहे. तर नुकतेच उन्मेष पाटील यांच्यासोबत भाजपमधून ठाकरे गटात पक्षप्रवेश केलेले करण पवार यांना जळगावमधून लोकसभेचं तिकीट दिलं आहे. बुलढाणा - नरेंद्र खेडेकर यवतमाळ-वाशिम - संजय देशमुख मावळ - संजोग वाघेरे-पाटील सांगली -चंद्रहार पाटील हिंगोली - नागेश पाटील आष्टीकर छत्रपती संभाजीनगर - चंद्रकांत खैरे धाराशिव - ओमराजे निंबाळकर शिर्डी- भाऊसाहेबर वाघचौरे नाशिक - राजाभाई वाजे रायगड - अनंत गीते सिंधुदुर्ग-रत्नागिरी - विनायक राऊत ठाणे - राजन विचारे मुंबई-ईशान्य - संजय दिना पाटील मुंबई-दक्षिण - अरविंद सावंत मुंबई-वायव्य - अमोल कीर्तिकर परभणी - संजय जाधव मुंबई दक्षिण मध्य - अनिल देसाई वैशाली दरेकर : कल्याण सत्यजित पाटील : हातकणंगले करण पवार : जळगाव भारती कामडी : पालघर

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475