जिल्हा

दावडी तलावात दोन तरूणांचा बुडून मृत्यू

दावडी तलावात दोन तरूणांचा बुडून मृत्यू
दावडी तलावात दोन तरूणांचा बुडून मृत्यू फोटो: ठाणे वैभव
डोंबिवली : डोंबिवलीजवळील दावडी येथील तलाव बंदरावर मेजवानी करण्यासाठी आलेल्या दोन जणांचा तलावातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने मंगळवारी दुपारी बुडून मृत्यू झाला. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणाची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. संतोष मौर्या (२९) रा. जगन्नाथ धाम सोसायटी, सागाव, चेरानगर, मानपाडा रस्ता, डोंबिवली पूर्व, भीमेश्वर उर्फ सुंदर भंडारी (२४) अशी तलावात बुडून मरण पावलेल्या तरूणांची नावे आहेत. या दोन्ही तरूणांचा चायनिज विक्रेता असलेला सहकारी अरविंद माळी (३८) यांनी दिलेल्या माहितीवरून मानपाडा पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलमाने अकस्मात मृत्युची पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. पोलीस ठाण्यातील तक्रारीत अरविंद माळी यांनी म्हटले आहे, की आपला मेव्हुणा संतोष मौर्या आणि आपल्या चायनिज हाॅटेलमध्ये काम करणारा स्वयंपाकी भीमेश्वर भंडारी मंगळवारी दुपारी दीड वाजता दावडी गाव हद्दीतील तुकाराम चौक भागातील दावडी बंदर तलाव येथे मेजवानीसाठी गेले होते. भोजन झाल्यावर ते पोहण्यासाठी तलावात उतरले. तेथील खोल पाण्याचा अंदाज त्यांना आला नाही. मुसळधार पाऊस सुरू असल्याने तलाव काठोकाठ भरला आहे. तलावात पोहत असताना ते पोहत तलावाच्या मध्यभागी गेले. तेथे पाण्याचे भोवरे तयार झाले होते. त्या गोलाकार भोवऱ्यांच्या मधून बाहेर पडताना त्यांची दमछाक झाली. या भागात खोल पाणी होते. भोवऱ्यातून पोहत बाहेर पडण्याची त्यांची धडपड सुरू होती. त्यांचे प्रयत्न तेथे फसले. ते भोवऱ्याजवळील खोल पाण्यात बुडाले. ते एकमेकांना बचावासाठी आणि बाहेरील लोकांना बचावासाठी ओरडा करत होते, पण तलाव तुडुंब भरला असल्याने कोणीही त्यांच्या बचावासाठी तत्काळ तलावात उडी टाकण्याचे धाडस केले नाही. दोन तरूण तलावात पोहत असताना बुडाल्याची माहिती दावडी गाव परिसरात पसरताच, ग्रामस्थ तलावाजवळ आले. पोलीस, अग्निशमन दलाला ही माहिती देण्यात आली. जवानांनी तलावात बोट फिरून पाणी ढवळून काढले. त्यावेळी दोन्ही तरूण पाण्यावर तरंगले. त्यांना तत्काळ पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अरविंद माळी, तरूण भंडारी या त्यांच्या नातेवाईकांकडे त्यांच्या मृतदेहांचा ताबा देण्यात आला. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे, साहाय्यक पोलीस निरीक्षक पवन नांद्रे, साहाय्यक पोलीस निरीक्षक संपत फडोळ यांनी घटनास्थळी देऊन या घटनेची माहिती घेतली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475