महाराष्ट्र

तुर्भे एमआयडीसीतील आगीत दोन कामगारांचा मृत्यू

तुर्भे एमआयडीसीतील आगीत दोन कामगारांचा मृत्यू
तुर्भे एमआयडीसीतील आगीत दोन कामगारांचा मृत्यू फोटो: ठाणे वैभव
तीन जणांना वाचवले नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसीमधील एका खेळणी बनवणाऱ्या कंपनीला आग लागल्याची घटना मंगळवारी अकरा ते साडे अकरा वाजता घडली. आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या व एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान या आगीत तीन कामगारांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले. तर धुरामुळे श्वास गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तुर्भे एमआयआयडीसीमध्ये डी २७२ गेट वे ही खेळणी बनवणारी कंपनी आहे. मंगळवारी सकाळी अकरा ते साडे अकरा वाजता कंपनीत भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच नवी मुंबई महापालिकेच्या नेरुळ, वाशी, कोपरखैरणे येथील अग्निशमन दलासह एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, आगीमुळे इतर कंपन्यांना धोका असल्याने तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी परिसरातील कंपन्यांमधील कामगारांना बाहेर सुरक्षितस्थळी जाण्याची सूचना केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी सांगितले. आगीचे नेमके कारण उशिरापर्यंत समजू शकलेले नाही. कंपनीत खेळणी बनवण्याचे लाकडी साहित्य असल्याने आगीने पेट घेतला आग लागली तेव्हा कंपनीत कामगार होते. त्यातील तीन जण छतावर चढले. त्यांना अग्निशमन जवानांनी वाचवले. यातील जितेंद्र शर्मा (४५) व शबुल्ला (२८) या दोन कामगारांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. शेवटचे वृत हाती येईपर्यंत अग्निशमन दलाकडून कुलिंग लचे काम सुरू ठेवून आत आणखी कोणी आहे का?याचा तपास सुरू होता.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475