महाराष्ट्र
भिवंडीत दोन हजार विद्यार्थ्यांनी घातले १०८ सूर्यनमस्कार
भिवंडीत दोन हजार विद्यार्थ्यांनी घातले १०८ सूर्यनमस्कार
फोटो: ठाणे वैभव
भिवंडी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील माजी उप महापौर व ज्येष्ठ नगरसेवक मनोज काटेकर यांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा केला.
कामतघर परिसरातील २१ शाळांमधील २०७१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत १०८ सूर्यनमस्कार घालून मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा केला आहे. विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्व पटवून देत असताना सुदृढ आरोग्यासाठी योगाभ्यास करणे गरजेचे आहे यासाठी पतंजली योग संस्थेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात शहरातील खाजगी व मनपा शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. स्व.मोतीराम काटेकर क्रीडांगणावर आयोजित केलेल्या या कार्यक्रमात माजी उप महापौर मनोज काटेकर, माजी नगरसेविका वंदना काटेकर यांसोबत पतंजली संस्थेचे डॉ तरुलभाई व्यास, सुरेश यादव, पोपटराव कदम, माजी प्राचार्य पी. एन. पाटील, राम पाटील, शरद म्हात्रे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475