जिल्हा

बिबट्याच्या हत्येप्रकरणी दोन संशयित वन विभागाच्या ताब्यात

बिबट्याच्या हत्येप्रकरणी दोन संशयित वन विभागाच्या ताब्यात
बिबट्याच्या हत्येप्रकरणी दोन संशयित वन विभागाच्या ताब्यात फोटो: ठाणे वैभव
विषप्रयोग की फास; वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा शहापूर: तालुक्यातील वाशाळा वनपरीक्षेत्रात वन्यजीव क्रूरतेची गंभीर घटना उघडकीस आली असून एका बिबट्याचे पंजे कापून नेल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दोन संशयितांना वन विभागाने ताब्यात घेतले आहे. घटनेमागील नेमका हेतू आणि बिबट्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यासाठी वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा केली जात असल्याची माहिती वन परीक्षेत्र अधिकारी एकनाथ रोंगटे यांनी 'ठाणेवैभव'शी बोलतांना दिली. जंगलालगतच्या भागात बिबट्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. तपासणीदरम्यान बिबट्याच्या पायाचे पंजे कापून नेल्याचे दिसून आले. वन अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामा करून नमुने जप्त केले आणि परिसरात शोधमोहीम सुरू केली. दरम्यान घटनेनंतर मिळालेल्या प्राथमिक धाग्यांच्या आधारे दोन संशयितांना वन विभागाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून वन्यजीव अवयवांच्या बेकायदेशीर व्यापाराशी संबंधित माहिती मिळण्याची शक्यता तपासली जात असल्याची माहिती श्री.रोंगटे यांनी दिली. अधिकृत पुष्टी मात्र चौकशी पूर्ण झाल्यानंतरच दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला की शिकार करून पंजे कापण्यात आले, याचा निर्णय वैद्यकीय तपासणी अहवालावर अवलंबून आहे. तज्ज्ञ पथकाने नमुने प्रयोगशाळेकडे पाठवले असून अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई निश्चित होणार आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475