जिल्हा

एकाच विषयाचे दोन प्रस्ताव, शिंदे गटालाच जास्त निधी

एकाच विषयाचे दोन प्रस्ताव, शिंदे गटालाच जास्त निधी
एकाच विषयाचे दोन प्रस्ताव, शिंदे गटालाच जास्त निधी फोटो: ठाणे वैभव
उपमहापौर कृष्णा पाटील यांचे शिवसेनेला चर्चेचे आव्हान ठाणे: मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडून चर्चा न करता महत्वाच्या विषयांना सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली जाते. चांगल्या प्रस्तावांना आमचा विरोध नाही, मात्र विषयांवर चर्चा न करण्याचे कारण काय? हिंमत असेल तर सभागृहात विषयांवर चर्चा करा, असे थेट आव्हान उपमहापौर कृष्णा पाटील यांनी शिवसेनेला दिले आहे. एकाच विषयाचे दोन प्रस्ताव करून या विषयाला मंजुरी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजपपेक्षा शिवसेना शिंदे गटाला निधी जास्त दिला असून यामागे नेमकी मिलीभगत काय आहे असा आरोप देखील उपमहापौरांनी केला आहे. गेल्या चार महिन्यांत सभागृहाच्या नियमांची पायमल्लीही शिवसेनेकडूनच होत असल्याचे प्रत्युत्तर देखील उपमहापौर कृष्णा पाटील यांनी दिले आहे. गेल्या आठवड्यात सभागृहात झालेल्या गोंधळानंतर भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेच्या कारभारच सर्व लेखाजोखा आता भाजपच्या वरिष्ठ पातळीवर दिला आहे. यावर आता वरिष्ठ पातळीवर काय भूमिका घेतली जाणार आहे या प्रतीक्षेत भाजपचे नगरसेवक आहेत. मात्र दुसरीकडे शिवसेनेच्या या कारभाराच्या विरोधात उपमहापौर आणि भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक कृष्णा पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी कृष्णा पाटील यांच्यावर केलेल्या आरोपांना देखील त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही सभागृहाचे संकेत मोडले नसून तुम्हीच दोन मिनिटांत कोट्यवधींच्या प्रस्तावांना गोंधळात मंजुरी देत असाल तर आम्ही शांत बसायचे का? आम्ही त्याला विरोध करायचा नाही का? असा प्रश्न उपमहापौरांनी उपस्थित केला आहे. निलंबनाला आम्ही घाबरत असून आम्ही त्याला तयार आहोत, दोघेही जनतेसमोर जाऊया, जनता ठरवेल मग कोण चुकीचं आहे आणि कोण बरोबर आहे. आतापर्यंत चार महासभा झाल्या. मात्र यामध्ये भाजपची अवहेलना करण्यात आली. आमचा अजेंडा पारदर्शकतेचा अजेंडा आहे, मी सभागृहात केले ते योग्यच केले. ३०१च्या विषयाला आमचा विरोध होता, तशी कल्पना देऊन मी खाली उतरलो, मात्र त्याचवेळी विषय मंजूर करून मी माझे आसन सोडून खाली आल्यावर राष्ट्रगीत सुरु केले जाते हे कोणते सभाशास्त्र आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ठाणे महापालिकेच्या महासभेत दादोजी कोंडदेव क्रीडागृहातील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल विस्तार प्रकल्पाच्या प्रस्तावाचा पर्दाफाश देखील उपमहापौरांनी केला आहे. सुरुवातीला सुमारे ४४.४५ कोटी रुपयांत मंजूर झालेले हे काम आता तब्बल ५५.५२ कोटी रुपयांवर पोहोचले असून, अतिरिक्त ११.०७ कोटी रुपयांच्या वाढीव खचार्ला मान्यता देण्याचा प्रस्ताव महासभेपुढे ठेवण्यात आला आहे. बाजारभावानुसार प्रति चौरस फुट नवीन कामासाठी पाच हजार रुपये दर असतांना या बॅडमिंटन हॉलच्या नुतनीकरणासाठी प्रती चौरसफुट नऊ हजार रुपये दर आकारण्यात आला आहे. तेवढ्या खर्चात नवीन वास्तु बांधून तयार होईल, असा दावा उपमहापौर कृष्णा पाटील यांनी केला आहे. नुकत्याच झालेल्या महासभेत हा विषय दोनदा घेण्यात आला आहे. ३५ ( अ) आणि ७२(ब) नुसार मंजुर करण्यात आला आहे. एकाच कामाची दोन बिले काढण्याचा यामागे विचार आहे का अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे. आमचा कामाला विरोध नसून चुकीच्या पध्दतीला विरोध असल्याचे मत उपमहापौर कृष्णा पाटील यांनी व्यक्त केले आहे. ४३२ कोटींचे विषय चर्चेविना मंजूर गेल्या चार महिन्यात झालेल्या महासभांमध्ये अनेक विषयांना चर्चेविना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये तब्बल ४३२ कोटींचे विषय चर्चेविना मंजूर करण्यात आले असल्याची माहिती उपमहापौर पाटील यांनी दिली आहे. निधीबाबतही सत्ताधाऱ्यांकडून दुजाभाव करण्यात आला असल्याचे उपमहापौरांकडून लक्ष वेधण्यात आले आहे. कामासाठी निधी देताना शिवसेनेला आतापर्यंत १५४.३० कोटी, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला ४.४५ कोटी तर भाजपच्या नगरसेवकांची संख्या ही २८ असताना त्यांना मात्र आतापर्यंत ३.०५ कोटीच देण्यात आले असल्याचे कृष्णा पाटील यांनी सांगितले. भाजप शिवसेनेवर केलेल्या काँग्रेसच्या आरोपांचा समाचार देखील त्यांनी घेतला आहे. ठाण्यात संपलेल्या काँग्रेसने आमच्यावर आरोप करू नये असा सल्ला त्यांनी काँग्रेसला दिला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475