जिल्हा
भिवंडीत विनापरवानगी दोन मोर्चे; आयोजकांवर गुन्हे दाखल
भिवंडीत विनापरवानगी दोन मोर्चे; आयोजकांवर गुन्हे दाखल
फोटो: ठाणे वैभव
भिवंडी: सोमवारी कल्याणरोड आणि मनपा मुख्यालयाच्या समोर विनापरवानगी मोर्चा आणि धरणे आंदोलन केले. त्यामुळे पोलिसांनी आंदोलन विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
कल्याणरोड येथे विना परवानगी अप्सरा टॉकीजसमोर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रकरणी कल्याण रोड व्यापारी रहिवासी कमिटीचे अध्यक्ष शादाब उस्मानी, दिन मोहम्मद खान, राम लहारे, मेहमुद इलीयास मोमीन, समिर सय्यद व इतर १५० ते २०० कार्यकर्ते यांच्या विरोधात पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. तर शहरात मनाई आदेश लागु असताना लोंकांना एकत्रित जमवुन विनापरवाना आंदोलन सभेचे आयोजन करुन घोषणाबाजी केल्याने काँग्रेस शहर जिल्हा कमिटीचे शहराध्यक्ष रशिद मोमीन, रेहाना अन्सारी, अरशी आझमी, अमित पहारिया, मोह नुमान खान, पंकज गायकवाड, श्रावण गुप्ता, सुरेश म्हस्के, दिनेश शेट्टी, सलाम शेख, सोहेल खान आणि यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475