जिल्हा

दोन लोखंडी राॅड वाहनावर पडले, पण दैव बलवत्तर...!

दोन लोखंडी राॅड वाहनावर पडले, पण दैव बलवत्तर...!
दोन लोखंडी राॅड वाहनावर पडले, पण दैव बलवत्तर...! फोटो: ठाणे वैभव
घोडबंदर मार्गावर मेट्रोचा निष्काळजीपणा ठाणे : भिवंडी येथे मेट्रो कामासाठी लागणारी लोखंडी सळई प्रवाशाच्या डोक्यात घुसल्याचे प्रकरण ताजे असताना, आता घोडबंदर मार्गावरील कापुरबावडी भागात दोन लोखंडी राॅड कारवर पडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे एमएमआरडीएकडून सुरु असलेल्या कामांविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कापूरबावडी भागात आतापर्यंत तीन वाहनांसोबत अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या आणि वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भिवंडी येथील काल्हेर भागात राहणारे ४७ वर्षीय अमोल लाठे हे त्यांच्या ८३ वर्षीय वडिलांना कारमधून घोडबंदर येथील एका खासगी रुग्णालयात गेले होते. परंतु रुग्णालय बंद असल्याने ते घोडबंदर येथून कापूरबावडीमार्गे काल्हेर येथे परतत असताना कापूरबावडी भागात अचानक मेट्रोच्या कामासाठी उन्नत मार्गावर ठेवलेले दोन राॅड त्यांच्या वाहनावर पडले. हे राॅड कारच्या आरशावर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर संतापलेल्या अमोल लाठे यांनी तेथील कंत्राटदार कर्मचाऱ्यांना जाब विचारला. तसेच पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. कापूरबावडी भागात यापूर्वी अशा दोन घटना उघडकीस आल्या होत्या. ३० जुलैला तत्वज्ञान विद्यापीठ भागातून प्रवास करणाऱ्या वाहन चालकाच्या कारवर राॅड पडला. या घटनेत चालक थोडक्यात बचावला होता. २ मे या दिवशी एका कारवर मेट्रो कामासाठी बसविण्यात आलेल्या क्रेनचा भाग कोसळला. या घटनेतही चालक आणि त्याचे कुटुंबिय बचावले होते. आता अमोल यांच्यासोबत ही घटना घडल्याने कंत्राटदारांच्या कामाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ठाणे शहरात मेट्रो चार (ठाणे- घाटकोपर-वडाळा) आणि मेट्रो पाच (ठाणे-भिवंडी-कल्याण) या मार्गिकेच्या निर्माणाची कामे सुरू आहेत. या कामांमुळे नागरिकांना वाहतुक कोंडीचा मन:स्ताप सहन करावा लागतो. त्यासोबत आता त्यांची सुरक्षितता देखील धोक्यात आली आहे. मेट्रो चार आणि पाच या दोन्ही मार्गिकांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या टप्प्याची कामे कापूरबावडी येथे सुरू असतानाही येथे कामामध्ये देखील निष्काळजीपणा दिसून येत आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475