जिल्हा
आधारवाडी कारागृहात गॅसचा भडका उडून दोन कैदी भाजले
आधारवाडी कारागृहात गॅसचा भडका उडून दोन कैदी भाजले
फोटो: ठाणे वैभव
कल्याण: मंगळवारी सकाळी कल्याणच्या आधारवाडी सेंट्रल जेलमध्ये गॅसचा भडका उडाल्याने दोन कैदी किरकोळ भाजले. दोघांनाही उपचारासाठी उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
खडकपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी कैद्यांची ओळख तारक गाझी (३०) आणि आसिफ सिंधू (३८) अशी पटली आहे. ते पाणी गरम करण्यासाठी कारागृहाच्या स्वयंपाकघरात गेले होते, तेव्हा अचानक गॅसचा भडका उडाला आणि ते भाजले. कारागृह कर्मचाऱ्यांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टरांच्या अहवालानुसार, तारक गाझी १०-१२ टक्के आणि आसिफ ३० टक्के भाजले आहेत. तारकवर उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, तर आसिफला कळवा येथे हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलीस कारागृहात दाखल झाले. पोलिसांनी स्वयंपाकघर आणि गॅस उपकरणांची तपासणी सुरू केली आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475