महाराष्ट्र
गॅस गळतीने उडालेल्या भडक्यात दोन जखमी
गॅस गळतीने उडालेल्या भडक्यात दोन जखमी
फोटो: ठाणे वैभव
ठाणे : कळवा, कावेरी सेतू येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तळ मजल्यावर तात्पुरत्या स्वरूपात राहत असलेल्या बांधकाम कर्मचाऱ्यांच्या किचन रूममधील गॅस सिलिंडरमधून गळती होऊन आग लागल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. यामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत.
मुस्तफा अहमद (18) आणि मुज्जमिल अहमद (18) हे बांधकाम कर्मचारी जखमी झाले असून त्यांना कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. माहिती मिळताच घटनास्थळी कळवा पोलीस, अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम हाती घेण्यात आले.
डॉक्टरांनी मुस्तफा याच्या उजव्या पायाला एक टक्का तर मुज्जमिल याच्या उजव्या हाताला नऊ टक्के भाजल्याचे सांगितले, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475