जिल्हा

गांजा विक्री करणारे दोघे जेरबंद

गांजा विक्री करणारे दोघे जेरबंद
गांजा विक्री करणारे दोघे जेरबंद फोटो: ठाणे वैभव
भिवंडी: भिवंडी शहरालगत के. बी. चौकी ते ताडाळी रोड दरम्यान दोन इसम गांजा हा अमली पदार्थ विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती सहायक पोलिस उपनिरीक्षक सुनिल साळुंखे यांना मिळाली होती. त्यानुसार तपास गुन्हे शाखा, घटक २ च्या पोलिसांनी सापळा लावून दोन जणांना अटक केली. प्रशांत उर्फ सलाड सुरेश तायडे (२७) व सोहेल उर्फ पित्तल इरफानअली अन्सारी (२०) अशी दोन आरोपींची नावे असून प्रशांत हा कल्याण येथील टिटवाळामध्ये राहत आहे तर सोहेल उर्फ पित्तल हा भिवंडीत राहत आहे. या दोघांकडून पोलिसांनी चार किलो ८२७ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ आणण्यासाठी वापरलेली दुचाकी असा एकूण तीन लाख ५४,८०० रुपये किमतीचा मुद्येमाल जप्त केला आहे. त्यांच्या विरोधात भिवंडी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आरोपींनी गांजा कोठुन आणला याचा तपास करत असताना आरोपी प्रशांत उर्फ सलाड सुरेश तायडे याच्या घरातील झडतीमध्ये अवैध माऊझर / पिस्टल आणि एक जिवंत काडतुस असा गुन्हयात एकुण तीन लाख ८५,१०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी हे २४ सप्टेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडीमध्ये असून पुढील तपास गुन्हे शाखा, घटक -२, भिवंडी यांच्याकडून सुरू आहे. ही कामगिरी गुन्हे शाखा, घटक २ भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सहायक पोलिस निरीक्षक श्रीराज माळी, सहायक पोलिस निरीक्षक मिथुन भोईर, पोलिस उप निरीक्षक रविंद्र पाटील, राजेश शिंदे, रामचंद्र जाधव, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुधाकर चौधरी, सुनिल साळुंके, पोलिस हवालदार निलेश बोरसे, साबीर शेख, सुदेश घाग, किशोर थोरात, वामन भोईर, राजेश गावडे, महिला पोलिस हवालदार माया डोंगरे, पोलिस शिपाई अमोल इंगळे, भावेश घरत, सर्फराज तडवी, रविंद्र साळुंखे यांनी बजावली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475