जिल्हा

ठाण्यात दोन डझन 'मुन्नाभाई'!

ठाण्यात दोन डझन 'मुन्नाभाई'!
ठाण्यात दोन डझन 'मुन्नाभाई'! फोटो: ठाणे वैभव
बोगस डॉक्टरांचा ठाणेकरांच्या जीवाशी खेळ ठाणे: ठाणे महापालिका हद्दीतील बोगस डॉक्टरांची संख्या वाढली असून कसलीही अधिकृत वैद्यकीय पदवी तसेच परवाने नसणारे २४ 'मुन्नाभाई' वैद्यकीय व्यवसाय करत असल्याची कबुली महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. परराज्यातून आलेले हे बोगस डॉक्टर ठाणेकरांच्या जीवाशी खेळ खेळत आहेत. अशा बोगस डॉक्टरांवर कारवाईच्या नावाने मात्र बोंब असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मुंबईलगतचे आणि सर्वात महत्वाचे शहर असलेल्या ठाणे शहरात बोगस डाॅक्टरांचा सुळसुळाट झाल्याची बाब पुन्हा उघडकीस आली. या बोगस डॉक्टरांनी घोडबंदरसह ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा भागातील झोपडपट्ट्यांमध्ये आपले दवाखाने थाटले आहेत. ठाणे पालिकेच्या मागील महासभेत शहरातील बोगस डॉक्टरांचा मुद्दा चांगलाच गाजला होता. त्यानंतर अशा बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक देखील करण्यात आली असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला होता. दरम्यान, या पथकाकडून प्रभाग समितीनिहाय कारवाई करण्यात आलेल्या बोगस डॉक्टरांची संपूर्ण माहिती उपमहापौर कृष्णा पाटील यांनी आरोग्य विभागाकडे मागितली. त्यानुसार १३ मार्च ते १८ मे या कालावधीत २४ संशयीत बोगस डॉक्टर असल्याची कबुली आरोग्य विभागाने दिली आहे. नठाणे महापालिकेच्या हद्दीत एकूण १७६७ खासगी दवाखाने आहेत. त्यातील १४५१ दवाखान्यांची तपासणी महापालिकेच्या विशेष पथकाकडून करण्यात आली असल्याचे पत्र पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी प्रसाद पाटील यांनी उपमहापौर कृष्णा पाटील यांना दिले आहे. या बोगस डॉक्टरांची नावे, त्यांचे पत्ते पालिकेने जाहीर करावेत, अशी मागणी कृष्णा पाटील यांनी केली आहे. घोडबंदर भागात सर्वाधिक बोगस डॉक्टर दिव्यासारख्या भागात दररोज नवनवीन दवाखाने सुरू होत आहेत. संपूर्ण दिव्यात पाच तर माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती हद्दीत सर्वाधिक सहा बोगस डॉक्टर आहेत. तर झोपडपट्टी समजल्या जाणाऱ्या लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती हद्दीत एकही बोगस डॉक्टर नसल्याने पालिकेच्या सर्वेक्षणावर प्रशचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. २४ संशयित बोगस डॉक्टरांच्या संदर्भात ठाणे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून चौकशी सुरु आहे. लवकरच या बोगस डॉक्टर संदर्भातील अहवाल तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी दिली.

संबंधित बातम्या

Advertisement 300x450

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement 300x600