महाराष्ट्र

दोन दुचाकीस्वार जबर जखमी; एकाची प्रकृती चिंताजनक

दोन दुचाकीस्वार जबर जखमी; एकाची प्रकृती चिंताजनक
दोन दुचाकीस्वार जबर जखमी; एकाची प्रकृती चिंताजनक फोटो: ठाणे वैभव
शहापूर-मुरबाडच्या अर्धवट रस्त्यावर अपघात शहापूर : तालुक्यातील शहापूर- सापगाव-लेनाड-मुरबाड-खोपोली महामार्गाची मागील सहा वर्षांपासून अर्धवट अवस्थेत असल्यामुळे या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच असून आज याच महामार्गावरील नडगाव जवळील भटपाडा फाट्याजवळ दोन दुचाकीस्वारांचा भीषण अपघात झाला असून दिलीप भवर याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शहापूर-मुरबाड या अर्धवट अवस्थेत असलेल्या रस्त्यामुळे त्यांना अंदाज न आल्याने त्यांचा अपघात झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. टेंभरे येथून शहापूरकडे प्रवास करीत असतांना भटपाड्याजवळ अर्धवट अवस्थेत असलेल्या रस्त्याचा या दुचाकीस्वारांना अंदाज न आल्याने त्यांची गाडी स्लीप झाली. यामध्ये बेंडेकोन येथील दिलीप भवर व टेंभरे येथील नागेश वेखंडे यांचा अपघात झाला. दोघांना शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान दिलीप भवर याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या अर्धवट महामार्गामुळे नियमित अपघात होत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475