जिल्हा

परिवहन बस चालकाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण

परिवहन बस चालकाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण
परिवहन बस चालकाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण फोटो: ठाणे वैभव
भाईंदर: मीरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बस चालकाला ठाण्यातील कोपरी येथे काही इसमांनी बेशुद्ध होईपर्यंत दांड्याने प्रचंड मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मीरा-भाईंदर महापालिकेची परिवहन सेवा ठाणे मार्गांवर धावते. दरम्यान, अशाच एका धावत्या बसला एका दुचाकी चालकाने कट मारला होता. त्यामुळे बस चालक आणि त्या दुचाकीस्वारामध्ये वाद झाला. गाडीत प्रवासी असल्यामुळे हा वाद तेथेच थांबला. मात्र, दुचाकी चालकाने नंतर बसचा पाठलाग केला. अखेर कोपरी येथे बस शेवटच्या स्थानकावर थांबल्यानंतर हा दुचाकी चालक आपल्या सहकाऱ्यांसह बसमध्ये चढला आणि थेट बस चालकाला मारहाण केली. यावेळी त्यांनी लाकडी दांड्याने हल्ला केला. इतकेच नव्हे, तर आरोपींनी चालकाला उचलून खाली रस्त्यावर आणले. यावेळी डोक्याला दुखापत झाल्याने चालक बेशुद्ध झाला. मात्र, आरोपी तेथेच थांबले नाहीत; त्यांनी वाहकालाही मारहाण केली. काही वेळानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. त्यानंतर वाहकाने जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. तसेच पुरावा म्हणून बसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही दिले. त्यावरून पोलिसांनी आरोपी निलेश शिंदे आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध खूनाचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा आणणे आदी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475