जिल्हा

भिवंडीत अंगणवाडी सेविकांसाठी “स्पर्श-एक एहसास” प्रशिक्षण

भिवंडीत अंगणवाडी सेविकांसाठी “स्पर्श-एक एहसास” प्रशिक्षण
भिवंडीत अंगणवाडी सेविकांसाठी “स्पर्श-एक एहसास” प्रशिक्षण फोटो: ठाणे वैभव
भिवंडी : गेल्या काही महिन्यांपासून अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे सामाजिक जागृतीसोबत अल्पवयीन मुलांमध्ये देखील जागृती करण्यासाठी भिवंडीतील अंगणवाडी सेविकांसाठी शहरातील इनरव्हिल क्लब, भिवंडी (डिस्ट्रिक्ट ३१४) यांच्या तर्फे “स्पर्श-एक एहसास” या सामाजिक उपक्रमांतर्गत शनिवार २८ मार्च २०२६ रोजी ज.ए.ई.च्या प. रा. विद्यालय येथे पूर्ण दिवसभराचे प्रशिक्षण शिबिर यशस्वीरित्या पार पडले.
या कार्यक्रमाला भिवंडीतील एकूण ३४१ अंगणवाडी सेविकांची शंभर टक्के उपस्थिती लाभली, ही या कार्यक्रमाची विशेष बाब ठरली. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी संतोष भोसले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अर्पण संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात बालकांवरील अत्याचार प्रतिबंध, त्याची ओळख, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि संवेदनशील हाताळणी याबाबत सखोल प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच बाल लैंगिक शोषण म्हणजे काय? त्याची लक्षणे कोणती आणि मुलांना अशा प्रकारच्या शोषणापासून सुरक्षित कसे ठेवायचे या बाबतही सेविकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश बाल अत्याचार थांबवणे हा असून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी 'स्पर्श' ग्रामीण प्रकल्प संयोजक सुरेखा पुनामिया यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले. या उपक्रमात नीता भोईर (प्रोजेक्ट कन्व्हेनर, भिवंडी), शिल्पा शेटे (अध्यक्षा), सोनल नाईक (सचिव), मनीषा मानिक, मृदुला दंड आणि लक्ष्मी सिंग यांनी विशेष योगदान देत सेविकांना मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध मान्यवर व संस्थांचे सहकार्य लाभले. एन.ई.एस.शाळेच्या माजी प्राचार्य गीतांजली अंबावणे तसेच रोटरी क्लब भिवंडी सेंट्रल, रोटरी क्लब भिवंडी रूरल आणि इनरव्हिल क्लब भिवंडीच्या सर्व सदस्यांचा सक्रिय सहभाग उल्लेखनीय ठरला.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475