जिल्हा

आज राज ठाकरे ठाण्यात

आज राज ठाकरे ठाण्यात
आज राज ठाकरे ठाण्यात फोटो: ठाणे वैभव
ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभांऐवजी पक्षाच्या शाखांना भेटी देण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, उद्या गुरुवार ८ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता ठाण्यातील मनसेच्या उमेदवारांच्या पक्ष कार्यालय व शाखेला भेट देणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या खेपेला ठाण्यात चमत्कार घडवण्याचा चंग बांधला आहे. ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीला कडवी टक्कर देण्यासाठी मनसेने २८ सुशिक्षित मराठी उमेदवार मैदानात उतरवले आहेत. ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या ह्या शिलेदाराना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः राज ठाकरे व्यक्तीशः उमेदवारांना भेटण्यासाठी ठाण्यात येत आहेत. सायंकाळी ५ वाजल्यापासून राज ठाकरे यांचा दौरा प्रारंभ होणार आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475