जिल्हा

सिव्हील रुग्णालयात जन्मले तिळे बाळ

सिव्हील रुग्णालयात जन्मले तिळे बाळ
सिव्हील रुग्णालयात जन्मले तिळे बाळ फोटो: ठाणे वैभव
प्रसूतीवेळी जोखमीच्या सिझरिंगनंतर दोन मुलं एक मुलगी आणि आई सुखरूप ठाणे: सिव्हिल रुग्णालयातील अद्ययावत प्रसूतीगृहात अत्यंत जोखमीच्या प्रसूती पार पडत असून, नुकतेच एका महिलेने तीन बाळांना जन्म दिला आहे. आई आणि तिन्ही बाळं सुखरूप असून मंगळवारी त्यांना घरी पाठवण्यात आले. ठाणे जिल्ह्यात बाळंतपणासाठी सिव्हील रुग्णालयातील प्रसूतीगृह आई आणि बाळासाठी वरदान ठरत आहे. रुग्णालयातील प्रसूतीगृह अद्ययावत असून, प्रसूतीसाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून महिला उपचारासाठी येत आहेत. प्रसूतीगृहात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसूतीगृहात एका महिलेने तीन बाळांना जन्म दिला असल्याची माहिती बालरोग तज्ज्ञ डॉ. सुरेश वानखेडे यांनी दिली. मुंब्र्यात रहाणाऱ्या एका २० वर्षीय महिलेला १८ फेब्रुवारी रोजी प्रसूतीगृहात महिलेची सिझरींगनंतर तीन बाळांना जन्म दिला आहे. यामध्ये दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. बाळांची प्रकृती उत्तम असून. वजन अनुक्रमे पहिले एक किलो ६०० ग्रॅम, दुसरे एक किलो ८०० तर एक किलो ५०० ग्रॅम आहे. त्यांच्या आईची प्रकृती ठणठणीत आहे. रुग्णालयात केलेल्या योग्य उपचारानंतर आई आणि बाळांना मंगळवारी घरी पाठवण्यात आले. प्रसूतीच्या वेळी बाल रोग तज्ज्ञ डॉ. सुरेश वानखेडे, स्त्री-रोग तज्ज्ञ डॉ. श्रेया शेळके, भुलतज्ज्ञ डॉ. प्रियांका महांगडे, डॉ. रुपाली यादव, डॉ. प्रकाश बोरुळकर, डॉ. शैलेश गोपनपल्लीकर, डॉ. राहुल गुरव, डॉ. सिद्धार्थ शहा ,एसएनसीयू परिचारिका सारिका शेणेकर, शीतल जठार आदी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. सोनोग्राफी रिपोर्टनुसार समजले की या महिलेच्या पोटात तीन बाळं आहेत. हे समजताच खूप आनंद झाला होता. यानंतर महिलेने दिलेल्या सर्व सूचना व पथ्य पाळून वेळोवेळी तपासणी केली. तीन बाळं एकत्रित सांभाळताना मोठी जबाबदारी आमच्यावर असते. मात्र असे असले तरी, एसएनसीयूमधिल आमचे बालरोग तज्ज्ञ, वैद्यकिय अधिकारी आणि नर्सिंग स्टाफ़ आई आणि बाळाची आपुलकीने काळजी घेत असतात, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475